सागर कुलकर्णी, मुंबई : भाजपचे नेते आणि ॲापरेशन लोटसमध्ये महत्वाची भुमिका पार पाडणारे मोहित कंबोज यांचा 2 जुनचा एक व्हिडीयो जोरदार व्हायरल होत आहे. मोहित कंबोज यांना नोटिस देण्यापासून ते त्यांच्यावर झालेला हल्ला यानंतर मोहित कंबोज यांनी एक मोठी घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा देत म्हटले होते की, 'एक तारिख तुमची आहे ३० तारिख माझी असेल, लक्षात ठेवा मी इथेच आहे. 1 जुलै तुम्हाला बघू देणार नाही'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर बरोबर 30 जुलै रोजी म्हणजेच काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आज सरकार अस्तित्वात नाही.



मोहित कंबोज यांनी शब्द केला खरा...


मोहित कंबोज यांनी आपला शब्द खरा करून दाखवल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ॲापरेशन लोटसमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून मोहित कंबोज यांनी पार पाडली महत्वाची जबाबदारी आहे. 


शिंदे गटाच्या सर्व आमदारांना मुंबईतून बाहेर काढण्यापासून ते त्यांना सुरत आणि गुवाहाटीला घेऊन जाण्यात कंबोज यांच मोठ योगदान आहे.  याचबरोबर या सर्व सिक्रेट ॲापरेशनची संपुर्ण माहिती असणाऱ्या मोजक्याच लोकांपैकी कंबोज एक आहेत.


कंबोज यांची भविष्यवाणी ठरली खरी


यापुर्वी संजय राऊत यांना अनेकदा अडचणीत आणण्याच काम सातत्यानं कंबोज करतच होते.  नवाब मलिक यांच्या अटकेमागील सर्वात महत्वाची जबाबदारी ही कंबोज यांनीच निभावली होती. संपुर्ण पुरावे गोळा करत फडणवीसांना देण्यात कंबोज यांचा महत्वाची भूमिका मानली जात आहे.