प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर अत्याचार
आपल्या प्रियकरासोबत जंगलात फिरायला गेलेल्या अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली असून पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर तिरोडा तालुक्यातील धापेवाडा या जंगल परिसरात फिरायला गेले होते.
गोंदिया : आपल्या प्रियकरासोबत जंगलात फिरायला गेलेल्या अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली असून पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर तिरोडा तालुक्यातील धापेवाडा या जंगल परिसरात फिरायला गेले होते.
त्या ठिकाणी आलेल्या अज्ञात तरुणांनी आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते आहोत असे धमकावत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला तसंच प्रियकराकडून पैसे देखील उकळले.
तरुणीने दुर्ग पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली तर घडलेला प्रकार हा तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे तिरोडा पोलिसांनी केवळ २४ तासाचा आत या घटनेत सहभागी असणाऱ्या तिघांना अटक केली.
आरोपींविरुध्द कलम ३७६ सह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.