कोल्हापूर : एका चिमुरडीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी नराधम नितीन दिलीप लायकर या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलंय. उल्लेखनीय म्हणजे, नितीन लायकर हा सद्य नगरसेविकेचा पती आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून नितीन लायकर याला रात्री उशिरा ताब्यात घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकीय क्षेत्रातील वलय असलेला आणि इचलकरंजी भागात राहणारा 40 वर्षीय नितीन लायकर याची कृष्णकृत्ये उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. लायकर अवघ्या 10 वर्षांच्या चिमुरडीवर गेल्या तीन वर्षापासून अत्याचार करत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. 


टीव्ही मालिका क्राईम पेट्रोलमधील बलात्काराचा कार्यक्रम दाखविणं तसंच अश्लील चित्रफीत दाखवून इतर घृणास्पद प्रकार नितीन याने मुलीशी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. त्याचबरोबर त्याने मुलीच्या शरीरावर चावे घेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न ही वारंवार केला आहे. 


हा प्रकार अनेकदा झाल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीच्या आईनं स्वत: पोलीस स्टेशन गाठलं... आणि फिर्याद दाखल झाली. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत लायकरवर बलात्कार, लहान मुलावरील लैंगिक अत्याचार (पोक्सो) तसेच भा.द.वि.स. कलम 324 आदीन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी नितीन लायकर याला अटक केलीय. त्याने सावकारी केल्याचंही पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.