Imtiyaz Jaleel : खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा नोटा उडवल्यात
Money Rain in Sambhajinagar : संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यावर पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Imtiyaz Jaleel Money Rain : खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video on Social Media) इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरमध्ये 'कव्वाली नाईट' आयोजित केली होती. त्यावेळी त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी पैसे उधळले. विशेष म्हणजे याआधीही जलील यांच्यावर अशाच प्रकारे पैशांची उधळपट्टी झाली होती. त्यावेळीही जलील यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता पुन्हा एकदा जलील यांच्यावर कार्यकर्त्यांनी पैशांचा पाऊस पाडला.
समर्थकांकडून अक्षरशः नोटांचा पाऊस
खासदार जलील यांच्याकडून शुक्रवारी आमखास मैदानावर कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, कव्वाली सुरु होताच समर्थकांनी जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला. (Money Rain) पाडण्यात आला आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाला असून जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील खुलताबाद येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमात आणि एका लग्नसमारंभात अशाच नोटा उधळल्या गेल्या होत्या. (अधिक वाचा - Earn Money: घराचे छत, टेरेस खाली असेल तर करा लाखोंची कमाई, आजच करा हे काम)
कव्वाली कार्यक्रमात घडला प्रकार
खासदार जलील यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत. या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येक जण येऊन भेटी देत आहेत. शुक्रवारी कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, कव्वाली सुरु होताच समर्थकांनी जलील यांच्यावर अक्षरशः नोटा उडवल्यात. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर न जाणारे जलील यांच्यावर अशा प्रकारे पैसे उधळताना बघून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
याआधीही दोन वेळा नोटांचा पाऊस
दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये एमआयएमचे तत्कालीन औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचे लग्न झाले होते. यावेळी कव्वालीच्या कार्यक्रमात जलील नरवदेवाला भेटण्यासाठी व्यासपीठावर जाताच त्यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली होती. तर, खुलताबाद येथे आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमात देखील जलील यांच्यावर अशाच प्रकारे नोटा उडविण्यात आल्या होत्या. त्यामुळे नोटा उधळणावरुन पुन्हा एकदा वादाला तोंड फुटणार आहे.