पुणे : Viral News : सध्या तापमान वाढत असल्याने अनेक ठिकाणी प्राण्यांचे हाल मोठ्या प्रमाणावर  होत आहेत. त्यामुळे जर तुमच्या घराच्या छतावर पाण्याच्या टाकी असतील तर त्या टाक्यांची झाकणे व्यवस्थित लावा. अन्यथा काय होईल, ते तुमच्या या व्हिडिओवरुन लक्षात येईल. मात्र, मनसोक्त डुंबलो बुवा....टेरेसवरील पाण्याच्या टाकीत, असे ही माकडं म्हणत असतील, हे नक्की. (Monkey bath) माकडांची धमाल मस्ती पाहून तुम्ही उन्हाळाही विसराल, हेही नक्कीच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर माकडांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. माकडं पाण्याच्या टाकीत उतरली आणि माकडं मस्तपैकी डुंबल राहिलीत. पाण्यात उतरलेली ही माकडं पाण्यासाठी तहानलेली असतील, असे वाटत होते. मात्र, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल उकाड्याने हैराण झाल्याने मिळालेल्या संधीचे सोने करत चक्क पाण्यात डुबकी मारली. 


मोठ्या प्रमाणात जंगल तोड होत आहे. वन्यप्राणी आता शहरांकडे येत आहेत. उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे वन्यजीव प्राण्यासांठी पाण्याची व्यवस्था करण्याची यावरुन कल्पना येऊ शकते. पाण्यांसाठी छतावर पाणी ठेवावं, त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना नवे संकट येणार नाही, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.  सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून तीन माकड पाण्याच्या टाकी वरची झाकण काढून पाण्यात डुबकी मारताना पाहायला मिळतात