COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : येणार येणार म्हणून इतके दिवस ज्याची वाट पाहात होतो, तो मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झालाय. कोकणात मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत.   तर, हवामान विभागानं आज आणि उद्या मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिलाय. नवीन अंदाजानुसार मुंबईसह संपूर्ण कोकणसाठी आज आणि उद्याचा दिवस महत्त्वपूर्ण असणार आहे.


यापूर्वी हवामान खात्यानं १० आणि ११ जूनला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. दरम्यान मुंबईत मात्र आज निरभ्र आकाश आहे. ८, ९ आणि १० तारखेला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.