पुणे : यंदा मान्सून सरासरी एव्हढाच बरसणार आहे. त्यातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस होणार आहे. हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने ही माहीती दिलीय. यंदा सरासरीच्या ९६ टक्के एव्हढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एल निनोचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचा फायदा मान्सून चांगला होण्यासाठी होईल. तसेच, इंडियन ओसीयन डिपॉल अर्थात आयओडी हा स्थानिक घटक देखील मान्सूनवर परीणाम करणार आहे. 


यंदा आयओडी सकारात्मक आहे. त्याचा परीणाम देखील मान्सून चांगला राहण्यासाठी होणार आहे. सराकात्मक आयओडीमुळं एल नीनोचा मान्सूनवर होणारा थोडाफार परीणाम भरुन निघेल. असा अंदाज पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डी. एस. पै यांनी व्यक्त केला आहे.