Monsoon In Maharashtra : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मात्र, पावसाला सुरुवात झालेली नाही. मात्र, राज्यात पुढच्या 4, 5 दिवसात  मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  केरळात मान्सून दाखल झाला असून तो पुढे सरकत आहे. राज्यात मान्सून कधी येणार याची उत्सुकता होती. ती आज अखेर संपली. नैऋत्य मान्सूनचे आज 11 जूनला आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण -मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा‌ आणि तामीळनाडू तसेच आंध्रप्रदेशचा‌ काही भाग व्यापला आहे.


पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राज्यात पुढील 4, 5 पाच दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असली तरी येत्या तीन ते चार तासात कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यावेळी हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाने राज्यातील 7 जिल्ह्यांना झोडपले, वादळाचा तडाखा; झाड कोसळून महिलेचा मृत्यू



 काल वळीवाच्या पावासने राज्यात अनेक ठिकाणी झोडपून काढले होते. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. यावर्षी केरळात मान्सून एक आठवड्यानंतर उशिराने दाखल झाला. 8 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनतर महाराष्ट्रात मान्सून पोहोचला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.  यावर्षी मान्सून यंदा चार ते पाच दिवस उशिराने दाखल झाला आहे.


अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळे (Cyclone Biparjoy) मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला. अखेर मान्सून केरळ दाखल झाल्यानंतर तो महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळे मान्सूनचे आगमन उशिराने झाले आहे.