मुंबई : विदर्भात रविवारपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाची विश्रांती कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात रविवारपासून पाऊस हजेरी लावणार आहे.  ऑगस्टमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भातील पूर्व भागांतील जिल्ह्यांत रविवारपासून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र मोठ्या पावसाची विश्रांती आणखी काही दिवस कायम राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणीच या काळात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.



ऑगस्टमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे. विदर्भातील तब्बल नऊ जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. मात्र,  २९ ऑगस्टला गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ३० ऑगस्टला चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. 


गेल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर वरुणराजा पुन्हा बरसण्याची दाट शक्यता आहे. नागपूर, गोंदियासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी ही निश्चित दिलासादायक बातमी आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठीही आनंदवार्ता आहे.