Monsoon Updates : आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल
Maharashtra Monsoon News : सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय.
Maharashtra Weather News : उकाड्यापासून सर्वसामान्याची सुटका झालीय. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी याबद्दल माहिती दिलीय. नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचले, असं होसाळीकर म्हणालेत.
मान्सून 4 जूनला गोव्यात धडकल्यानंतर आज तळकोकणात पोहोचणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. नैऋत्य मोसमी वाऱ्यासह पाऊस तळकोकणात दाखल झाला आहे. या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये संपूर्ण देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यामुळे धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यास मुंबई, ठाण्यासह राज्यातील पाणी संकट दूर होईल.