मुंबई: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता बऱ्याच ठिकाणी अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक भागांतील शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचं संकट ओढवल्यानंतरही बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आता बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने पुढील दोन महिन्यातील पावसाचा अंदाज कसा असेल याबाबत सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या उर्वरित वाटचालीबाबत माहिती दिली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर या मान्सूनच्या उर्वरीत महिन्यांमध्ये देशभरात सामान्यापेक्षा चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. 



कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रा मुसळधार पावसानं हाहाकार माजवला. शेती-घरं गावंच्या गावं पाण्याखाली गेली. मात्र महाराष्ट्रातील काही भाग हा आजही कोरडा आहे. तिथले शेतकरी मात्र चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. गणेशचतुर्थी निमित्तानं बळीराजाचं हे विघ्न बाप्पा दूर करेल अशी शेतकऱ्यांना आस आहे.