नवी दिल्ली : कोरोनाचे संकट जगावर घोंघावतय. हा जीवघेणा विषाणू लोकांना शारीरिकच नव्हे तर मानसिक खच्चीकरण करत असल्याचा निष्कर्ष निघत आहे. जगभरातील वैज्ञानिक यावर उपाय शोधत आहेत. यामध्ये अजून काही महिने जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला कोरोना पॉझीटीव्ह असलेल्यांनी किंवा लक्षणं आढळलेल्यांना आयसोलेशन म्हणजे स्वत:ला वेगळे ठेवणं हा पर्याय समोर आला आहे. पण याची देखील मोठी किंमत चुकवावी लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीला वेगळं ठेवलं जात. ब्रुसेल्स येथील एका नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांना याचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यांच्याकडे काळजी करण्यासाठी देखील वेळ उरला नाहीय. कोरोनाच्या तुलनेत लोक एकटेपणाने जास्त मरतील असे तिथल्या कर्मचाऱ्यांचे मत आहे. झी न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.


कोरोना व्हायरसमुळे लोकांना एक नव्हेतर दोन त्रासांना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर आजारात मरणाची भीती आणि दुसरे मानसिक स्वास्थ्य. आता पुढे काय होणार ? या विचाराने अनेकजण ग्रासले आहेत. 



कोरोना पॉझिटीव्ह असल्याने रुग्णालयात उपचार घेत असेलेले रुग्ण आणि कोरोनाशी लढा देण्यात पुढच्या फळीत असेलेल आरोग्य कर्मचारी हे दोघेही उच्च स्तराच्या तणावातून असल्याचे दिसून आले आहे.