मुंबई : मागच्या २४ तासांत राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सर्वात मोठा आकडा म्हणजे आज राज्यात ६३६४ नवे रूग्ण आढळले आहेत. राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर आज राज्यात ३५१५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आतापर्यंत एकूण १,०४,६८७ कोरोनाबाधित रूग्ण घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५४.२४% एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात ६३६४ नवीन रूग्ण आढळले आहे. 



राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी १५० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ४८ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३४% एवढा आहे. राज्यात सध्या ५,८९,४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४२,३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत ८२,०७४ बाधित रूग्ण आढळले आहेत. राज्यात आज एकूण ७९,९११ ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. तर ठाण्यात ४३,६३४ रूग्ण आढळले आहेत.