Child Dies in Nagpur : पालकांनो मुलांकडे लक्ष ठेवा, अन्यथा अशी धक्कादायक दुर्घटना घडू शकते...
Child Death : आता नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ( Nagpur News) मच्छर मारण्यासाठी आणलेली रिफिल बॉटल तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Nagpur Child Death : आता नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ( Nagpur News) मच्छर मारण्यासाठी आणलेली रिफिल बॉटल तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिव्या चौधरी असे या चिमुकलीचं नाव आहे. (Maharashtra Marathi News)
सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आशीर्वाद नगरमध्ये राहणारी दीड वर्षाची दिव्या घरात खेळत होती. त्यावेळी तिने मच्छर मारण्यासाठीची रिफिल बॉटल तोंडात घातली आणि ती बॉटल तिने चाखली. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती खराब झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या घटनेने आई वडिलांना जबर धक्का बसला असून, चिमुकलीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घरात लहान मुलं असतील तर त्यांना एकटं सोडू नका, त्यांच्याजवळ अशा विषारी वस्तू ठेवू नका आणि काळजी घ्या. त्यामुळे अशा घटना होणार नाहीत.