Pune Wakad News: पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासह इमारतीच्या 9व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली आहे. शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाकड येथील रीगालिया या उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ही स्क्रिझोफेनिया या आजाराने ग्रस्त होती. कोमल आवटे असं या महिलेचे नाव असून ती तिच्या 4 वर्षांच्या मुलासह राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल यांनी इमारतीतून उडी मारताना चार वर्षांचा मुलगा विहान याला कडेवर घेत उडी मारली होती. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, कोमल या स्किझोफ्रेनिया या आजाराने त्रासलेल्या होत्या. त्यांच्यावर परदेशात आणि भारतात उपचार सुरू होते. मात्र, या उपचारांना काहीच प्रतिसाद येत नव्हते. त्यामुळं त्या नैराश्यात गेल्या होत्या. काहीच दिवसांपूर्वी त्या पुण्यात परतल्या होत्या. त्यानंतर इथे आल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला तिच्या पतीसह अमेरिकेत राहत होती. तर त्यांचे सासू-सासरे पुण्यात राहत होत्या. काही दिवसांपूर्वीच पुण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी चार वर्षांच्या मुलासह इमारतीतून उडी घेतली. यात त्यांचा जागेच मृत्यू झाला. या घटनेमुळं त्यांचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.


लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या


लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मावळ मधील तळेगावमध्ये ही धक्कादायक घटना आज सकाळी घडली. सूरज रायकर हा 28 वर्षीय तरुण मंगळवारी बोहल्यावर चढणार होता. देहूगावात सायंकाळी साडे पाच वाजता सूरज विवाहबंधनात अडकून, नव्या आयुष्याची सुरुवात करणार होता. लग्नाची सगळी तयारी झाली होती. लग्नाच्या दिवशीच सूरजने त्याच्या मामाला मेसेज केला. मी आत्महत्या करत आहे, असं त्यात नमूद असल्याचं पाहताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. मग सर्वानी परिसरात सूरजला शोधण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीजवळ गाडी अन काही वस्तू आढळल्या. यावरून सुरजने विहिरीत उडी मारली असेल, असा अंदाज बांधण्यात आला.