तुमच्या मुलांवर एवढं कधीच रागवू नका; कारण तो साडे 3 वर्षांचा चिमुकला कधीच परतणार नाही
नाशिकमधील धक्कादायक घटना; तो मुलगा आणि त्याची आई आता कधीच परतणार नाही.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये प्ले स्कूलचा अभ्यास करत नसल्याचा राग अनावर झाल्यानं एका आईनं पोटच्या गोळ्याची हत्या केलीय. त्यानंतर आईनं गळफास घेऊन आत्महत्या केली. रिधान असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे तर शिखा सागर पाठक असं मुलाची हत्या आणि त्यानंतर आत्महत्या करणा-या आईचं नाव आहे. पाथर्डी फाटा परिसरात ही मन सुन्न करणारी घटना घडलीय. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आलीय. पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.
नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील राहत्या घरात मुलाचा खून करून एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केलीये. 32 वर्षीय महिलेचे नाव शिखा सागर पाठक असे आहे राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून या महिलेने हा प्रकार केलाय. आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने गळा दाबून खून केला असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांना साडेतीन वर्षीय मुलाचा देखील मृत्यूदेह घरात आढळून आला आहे. दरम्यान, मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस अधिक तपास करत आहेत.