Pune Crime News : सर्वत्र जागतिक महिला दिन (Womens Day 2023 ) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात (Pune) महिला दिनी भयंकर घटना घडली आहे. एका सासूने सुनेसह असे धक्कादायक कृत्य केले की पोलिसही हादरले आहेत. सासूने केलेल्या कृत्यामुळे सुनेचा जीव गेला आहे (Pune Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी सासूला पोलिसांनी अटक केली आहे. फरशीवर डोके आपटून सासूने सुनेचा खून केला आहे. पुण्यातील घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस तपासात हत्या करण्यामागे धक्कादायक कारण उघड झाले आहे. 
पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लोहगाव परिसरात ही घटना घडली आहे.


सुनेची हत्या करणाऱ्या सासूला पोलिसांनी अटक केली आहे. कमला प्रभुलाल माळवी (वय 49) असे आरोपी सासूचे नाव आहे. रितू रवींद्र माळवी (वय 28) असे मृत सुनेचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक समु चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 


रितूला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालयाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केली असता रितू घरात काम करताना पडली आणि जखमी झाली असे कमला यांनी पोलिसांना सांगितले. 


मात्र, शवविच्छेदन अहवालात रितुच्या डोक्याला दुखापत तसेच तिला मारहाण‌ झाल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी रितूची सासू कमलाची कसून चौकशी केली. तेव्हा तिने सुनेला बेदम मारहाण करुन तिचा खून केल्याची कबुली दिली.
सून घरात व्यवस्थित काम करत नाही. नातवाला व्यवस्थित सांभाळत नाही या कारणावरून सासू आणि सुनेत कायम वाद होत होते. याच कारणावरून सासू सुनेचा छळ करायची.


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आरोपी सासू घरातील फ्रिजचा दरवाजा उघडत होती. यावेळी तिचा पाय चुकून सुनेला लागला. या कारणावरून दोघींमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर कमलाने रितूला मारहाण केली. तिचे डोके फरशीवर आपटले. या घटनेत रितुच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असे कमलाने पोलिसांना सांगितले.