Crime News : रात्री आई बाबांसोबत हसत खेळत जेवले पण सकाळी झोपेतून उठलेच नाहीत.  एका रात्रीत दोन लहान भावंडांसह अत्यंत भयानक प्रकार घडला आहे. सकाळी ही दोन्ही मुलं मृत अवस्थेत आढळली. संभाजीनगर (sambhajinagar) मध्ये  हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिस तपासात या मुलांच्या मृत्यूमागे अत्यंत खळबळजनक कारण समोर आले आहे (Crime News).  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहा वर्षाचा मुलगा आणि चार वर्षाच्या मुलीची हत्या झाली आहे. सोमवारी संध्याकाळी या दोन चिमुकल्यांना घाटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. शव विच्छेदन अहवालात या मुलांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे उघडकीस आले. 
प्राथमिक  माहितीनुसार रविवारी या मुलांनी आई बाबांसोबत हसत खेळत जेवण केले. यानंतर ही मुलं झोपी गेली. सकाळी मुलांची आई त्यांना उठवत झोपेतून उठवत होतीय. मात्र, मुल उठलीच नाहीत.


या मुलांच्या आईन तात्काळ सर्व नातेवाईकांना शेजाऱ्यांना बोलावले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या मुलांना घाटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी या मुलांना मृत घोषित केले. या दोन्ही मुलांचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचं पुढे आलं. मुलांचे शव विच्छेदन करण्यात आले. शव विच्छेदन अहवालात या मुलांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले.  


मात्र, या मुलांची हत्या कुणी केली कळणं शक्य नव्हत. पोलिसांनी रात्रभर या सगळ्या गोष्टींचा तपास केला. तपासात धक्कादायक माहिती समोर आली. जन्मदात्या मुलांच्या आईनच या मुलांचा खून केल्याचे उघड झाले. या निर्दयी मातेने सहा वर्षाचा मुलगा आणि चार वर्षाच्या मुलीला कपड्याने नाक आणि तोंड दाबून ठार केले आहे.  आलीय फहाद बसरावी (वय 22 वर्षे) असे या मातेचे नाव आहे. तिला अटक करण्यात आली आहे. या महिलेने आपल्या मुलांची हत्या का केला याचं कारण पुढं आलेले नाही. मात्र, ही महिला मनोरुग्ण असून त्यातूनच तिने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.