Mother`s Day 2023 : आईसारखं दैवत नाही! परीक्षा खोलीत तान्हुल्यास स्तनपान करत सोडवला पेपर
Mother`s Day 2023 Story : असं म्हणतात की देवाला प्रत्येकाकडे पोहोचणं कठीण झालं तेव्हा त्याने आईची रचाना केली. ही मायेची सावली आपल्या लेकाबाळांचा पाठीशी कायम खंबीरपणे उभी असते. मदर्स डे निमित्त अशाच एका हिरकणीची ही कहाणी...
Trend Mother's Day 2023 Story : आई ही देवाने निर्माण केलेली एक अद्भुत रचना आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ही मायेची सावली कायम खंबीरपणे उभी असते. मुलं हे तिचं विश्व...आणि त्याचा पालनपोषणापासून तिच्यावरील संकट स्वत:वर ओढवून घेतं. आई ही मुलांची पहिली गुरु असते. आई ही त्या काळातील असो किंवा या जमान्यातील आई आई असते...दोघींसमोर काळानुसार वेगवेगळी आव्हानं असतात...
म्हणून ती आई आहे...
आजच्या मुली लग्नानंतर शिक्षण पूर्ण करतात, नोकरी करतात. अशात कुटुंब, संसार, मुलांची जबाबदारी सांभाळत त्या कर्तव्यदक्ष असतात. घर आणि ऑफिस अशी दुहेरी भूमिका त्या पार पाडत असतात. आज जागतिक मातृदिनानिमित्त आज आपण भेटणार आहोत अशा आईला जीने परीक्षा आणि मुलं असे दोन्ही एकत्र सांभाळलं. (Mothers Day 2023 mother solves papers with baby she breastfeeding in exam room yavatmal news)
मातृत्वाचीच परीक्षा
शीतल राठोड हिचं लग्न झाल्यानंतर लगेचच बाळ झालं. त्यामुळे तिची बीए शेवटच्या वर्षातील गृहअर्थशास्त्राचा पेपर राहून गेला होता. मग पुढे काय..परीक्षा पुन्हा तोंडावर आली आणि तान्हुला फक्त सहा महिन्यांचा आहे. पण तिने ठरवलं आता परीक्षा द्यायचीच...चिमुकल्याला घेऊन ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. (yavatmal news)
पुसद तालुक्यातील जंगल भागातील बेलगव्हाण गावातून शीतल लहान बाळा घेऊन परीक्षा केंद्रावर आली खरी...पण त्याला सांभाळायला कोणी नाही, आता पेपर कसा देणार. तिची परीक्षा देण्याची जिद्द पाहून पर्यवेक्षक प्राध्यापक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तिच्या मदतीला धावून आलेत.
अन् तिने परीक्षा केंद्रातील खोलीत जमिनीवर चादर टाकली आणि बाळाला तिथे खेळायला सोडलं. ती घाई घाई पेपर सोडत होती पण शेवटी आई ना तिचं लक्ष बाळाकडे होतं. वेळ पुढे जात होता, तेवढ्यात बाळाने टाहो फोडला. बाळा भूक लागली होती...तिने पर्यवेक्षकांकडे पाहिलं आणि रडत असलेल्या बाळाकडे...
पर्यवेक्षकांनी संवदेनशीलता दाखवत शीतला तान्हुल्यास स्तनपान करु दिलं. शीतल पेपर सोडवत असताना पर्यवेक्षक बाळा घेऊन फिरतं होते. पण कामात व्यतत्य येत होता, म्हणून काही विद्यार्थींना मदतीला बोलवलं. पेपर आणि बाळा स्तनपान करत शीतलने अखेर पेपर दिला. शीतलमधील शिकण्याची जिद्द आणि तिच्यातील मातृत्वाला सगळ्यांनी सलाम केला.
"दरवर्षी परीक्षा केंद्रावर तरुणी बाळांसोबत परीक्षेसाठी येत असतात. मात्र, त्यांच्यासोबत कुणीतरी असतं. शीतल मात्र, एकटीच बाळाला घेऊन आली होती म्हणून आम्ही चिंतेत होतो. बाळाला जमिनीवर सोडून ती पेपर देत होती. तिची ही जिद्द पाहून आम्हालाही एक वेगळीच उर्जा मिळाली." असं, गुलामनबी आझाद समाजकार्य महाविद्यालयचे प्रा. धनंजय काठोळे म्हणाले.
शीतलला मातृदिनाच्या शुभेच्छा. ती प्रत्येक स्त्रीसाठी एक प्रेरणा आहे. तिच्या जिद्दीला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...