नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेचं पुण्यात आंदोलन
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारातील बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचं काम गेली ३ वर्ष रखडलंय. त्याविरोधात नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
पुणे : पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारातील बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचं काम गेली ३ वर्ष रखडलंय. त्याविरोधात नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
गोंधळाच्या माद्यमातून प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
नाट्यप्रेमी कलावंतांनी गोंधळ सादर करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या कामासाठी २० कोटींची आवश्यकता आहे. मात्र आतापर्यंत केवळ २ कोटींची तरतूद करण्यात आलीय. त्यामुळे इथलं काम रखडलंय.
शहरातील इतर थिएटर्सचीही अवस्था अशीच
अशीच अवस्था शहरातील इतर ३ मिनी थिएटर्सच्या कामाची आहे. असं असताना, जोपर्यंत या तीनही ठिकाणचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यँत सध्या चर्चेत असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला हात घालू नये अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलीय.