मुंबई : मराठा आरक्षणावरुन छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सूटत नसल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षाणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे (MP Chatrapati SambhajiRaje) हे राज्याचा दौरा करणार आहेत. 28 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहेत. कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात दौरा नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.


'ओबीसी समाजाचे ज्येष्ठ लोक भेटले त्यांनी मला चांगला मार्ग सांगितला. मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी दौरा करतोय. अनेक्षर भाषांतरीत झाली नाही त्यामुळे फटका बसला. लोकांना काय वाटतेय यापेक्षा कायदा काय आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठीच मी हा दौरा सुरु केलाय.' असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


'राज्य आणि केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायची ते पहावे लागेल. सारथी संस्थेची दुरवस्था किंवा वसतिगृहाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याचे काम राज्याने करावे. माझी भूमिका पक्षाची नाही तर समाजाची आहे. सर्वोच्च न्यायालाने सांगितले की, सप्टेंबर 2020 पूर्वीच्या नियुक्त्या राज्य सरकारने कराव्यात.' असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


'घराण्याचा वंशज म्हणून समाजाचा घटक म्हणून मी भूमिका घेतोय. भारताच्या इतिहासात संसदेत पहिल्यांदा आंदोलन करणारा मी पहिला खासदार आहे.' असं ही त्यांनी म्हटलं आहे.