औरंगाबाद : नेहमी चर्चेत असलेला औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या सभेत औरंगाबादचा उल्लेख करतांना, नामांतराची गरज काय, ते 'संभाजीनगरच' आहे, असं ठणकावलं होत. त्याला प्रत्युत्तर देताना रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आता भाजप सत्तेत आल्याशिवाय नामांतर होणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकबरुद्दीन ओवेसीला औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली वाहतांना लाज वाटली पाहिजे. औरंगजेबाच्या कबरीवर कुत्राही लघवी करणार नाही असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. त्यावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना खुल आव्हान दिलं आहे.


मुख्यमंत्रीसाहेब हे धंदे बंद करा. औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न आधी सोडवा. समाजा-समाजात तुम्ही तेढ निर्माण करत आहात. तुम्हाला देशाशी, महाराष्ट्राशी, औरंगाबादशी काहीही देणंघेणं नाही. फक्त सत्तेसाठी हे सगळं सुरू आहे, असा आरोपही यावेळी जलील यांनी केला.


काय म्हणाले जलील?
तुम्ही औरंगाबादला येणार असाल तर पाणी आणा. त्याबाबत बोला. हिंमत असेल तर तुमच्या कोणत्याही एका नगरसेवकाच्या भागात एकटे फिरा. त्यांना सांगा मी मोर्चा काढायला आलोय.  तिथल्या माता-भगिनींना भेटा. त्यांनी तुम्हाला हाणलं नाही तर मी तुम्हाला सांगतो.


औरंगबादला आता पाणी हवे. भाजपने एकातरी भागात जाऊन माता-भगिनींना विचारलं आहे का त्यांना पाणी हवे की नामांतर?  त्या पाण्याचा हंडा तुमच्या डोक्यावर हाणतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


मला मारण्याच्या धमक्या येत आहे


गणेश कराळे नामक व्यक्तीकडून मला मारण्याची धमकी आली होती. फोन आणि सोशल मिडीयाद्वारे मला धमक्या येत आहेत, पण मी घाबरणाऱ्यामधून नाही. नेतेचं मारण्याची भाषा करतात तर कार्यकर्ते अशी भाषा करणारच. मी त्यांच्या नेत्यांना महत्व देत नाही तर या किरकोळ कार्यकर्त्यांना कशाला महत्व देऊ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.  


सामाजिक कार्यकर्ता महापालिका आयुक्तांवर गेला होता धावून


काही दिवसांपूर्वी एक सामाजिक कार्यकर्ता पाणीप्रश्नावरून निवेदन द्यायाला जाताना महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या अंगावर धावला होता. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित सुरक्षारक्षकांनी आयुक्त पांडेय यांचा बचाव केला होता. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी दिवसभर कामबंद आंदोलन केले होते.