औरंगाबाद :  सरकारने कोणतीही कारवाई केली तरी 1 जुनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं, असा थेट इशारा एमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी दिला होता. आता खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इम्तियाज जलील यांनी कोरोना नियमांना हरताळ फासल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे नियम पायदळी तुडवत औरंगाबादेत जलील यांच्या उपस्थितीत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जलील यांच्यावर चक्क नोटांची उधळण करण्यात आली. औरंगाबादधल्या खुलताबाद परिसरात कव्वालीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते. कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलिल यांचं व्यासपिठावर आगमन होताच, तिथे उपस्थित असलेल्या कोही लोकांनी त्यांच्यावर नोटांची उधळण केली. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 



धक्कादायक म्हणजे, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह या व्हिडिओत दिसणाऱ्या एकाही व्यक्तीने मास्क घातला नव्हता. औरंगाबादमध्ये सध्या विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अशातच शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कव्वालीच्या कार्यक्रमाला शेकडोंची गर्दी जमली होती.