`करे योग, रहे निरोग` म्हणत खा. नवनीत राणा यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिन
मुंबई : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देऊन संबोधित केल आहे. विदर्भातील अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी देखील 'करे योग, रहे निरोग' म्हणत योग दिवस साजरा केला. योगाचं महत्व सांगत मोकळ्या वातावरणात खासदार नवीनत राणा योग साधना करताना दिसल्या.
काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील एका शेतात जाऊन शेतकऱ्यांना पेरणी करण्याच्या कामात मदत केली आहे. रस्ता ओलांडून शेत तूडवत बांधावर जात त्यांनी पेरणी करणाऱ्या बैल जोडीची आणि शेतकऱ्यांचे औक्षण करून थेट कासरा हातात घेत पेरणी केली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान मोदी यांना देशाला संबोधित केले. त्यांनी यावेळी सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटलं की, 'आंतरराष्ट्रीय योग दिन हा एकतेचा दिवस आहे. जो विश्व बंधुत्वाचा संदेश देतो. यंदाचा योग दिवस कुटुंबातील बाँडिंग वाढवण्याचा योग आहे. आपली इम्युनिटी चांगली असेल तर आजारावर विजय मिळवू शकतो. प्राणायममुळे शरिराची स्ट्रेंथ वाढते. हे प्रभावी आहे. प्राणायमचे अनेक प्रकार आहेत. प्राणायमचा तुमच्या व्यायामात समावेश करा.'