औरंगाबाद : नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि औरंगाबादच्या गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या सध्या चांगलीच जुंपली आहे. प्रशांत बंब ब्लॅकमेलर आहेत ते रस्त्यांच्या कामाबाबत तक्रारी करतात आणि नंतर मांडवली करतात असा आरोप चिखलीकर यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत राज्याच्या प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात प्रशांत बंब यांच्या तक्रारीवर काहीही करू नये असं त्यांनी म्हटलं आहे. तर याला प्रशांत बंब यांनी सडेतोड उत्तर दिलंय. 


तुमच्या पत्रातील भाषा वाचून तुम्हीच कंत्राटदारांचे जवळचे नातेवाईक असल्याचा दिसताय असा आरोप केलाय, आतापर्यंत जितक्या तक्रारी केल्या त्यातील एकही माघारी घेतली नाही आणि ब्लॅकमेलर असेल तर सिद्ध करा असं आवाहन प्रशांत बंब यांनी केलं आहे.


रस्त्यांच्या कामावर तक्रार केल्याने हा वाद सुरू आहे. प्रशांत बंब यांनी राज्यातील अनेक रस्त्यांच्या कामाबाबत तक्रारी केल्यायत आणि त्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. बंब यांनी केलेल्या तक्रारींमध्ये नांदेडमधल्या कामांचाही समावेश आहे.