Devendra Fadnavis : कोल्हापुरात (Kolhapur) कर्जाची परतफेड करत नसल्याने सावकर गुंडांच्या माध्यमातून कुटुंबाला मारहाण करत धमकावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जाची परतफेड न केल्यास कर्ज घेणाऱ्या कुटुंबातील महिलांना वेश्या व्यवसाय (Prostitution) करण्यास भाग पाडू अस सावकाराने धमकावलं आहे. दुसरीकडे पोलीस तक्रार करुनही घटनेची दखल घेत नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकाराबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्यांग बांधवाना एडीआयपी ADIP योजनेअंतर्गत आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव  तातडीने उपलब्ध व्हावेत यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने गेले अनेक महीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना काहीच मदत केली जात नाही असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबतचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरात घटनेवर प्रतिक्रिया दिली.


सुप्रिया सुळे यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत भाष्य केले. "राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत. दौंडमधली गुन्हेगारी, खून, पुण्यातील कोयता गँग, महिलांवर अत्याचार हे सातत्याने राज्यात होत आहे. राज्यात एवढं सगळं होतंय हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हे माझं वैयक्तिक मत आहे," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.