सातारा : खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धेच्या वेळी खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या अनोख्या स्टाईलनं जमलेल्या तरुणांना साद घातली. यावेळी ते काही वेळासाठी भावूक देखील झाले होते. नेहमी प्रमाणे कॉलर उडवून त्यांनी तरुणाईचा उत्साह वाढवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुम्हीच माझी कॉलर आहात' हे सांगायला ते विसरले नाहीत. यावेळी त्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद पण लुटला.


छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांची क्रेज तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अनेक तरुण त्यांना फॉलो करतात. त्यांची स्टाईल देखील नेहमीच चर्चेचा विषय असते. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उपस्थितांना एकच जल्लोष केला. खासदार उदयनराजे यांनी दहीहंडी देखील फोडली.