प्रथमेश तावडे, झी मीडिया, पालघर :   राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण पेटले आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. खासदार उदयनराजे भोसलेंना (Udayanraje Bhosale) यांनी देखील राज्यपालांवर नाराजी व्यक्त करत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे(Maharashtra Politics). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्याला कापून फेकले पाहिजे अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.  खासदार उदयनराजे भोसले यांनी आज नालासोपाऱ्यातील मराठा उद्योजक लॉबीच्या पाचव्या वर्धापन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. 


यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिले. सुधांशु त्रिवेदी याला चप्पलने मारायला पाहिजे तर कोश्यारी यांना आता राज्यपाल पदावरून खाली उतरवायला पाहिजे असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले. महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या सुधांशु त्रिवेदी व भगतसिंग कोशियारी यांनी जाहीर माफी मागावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली असल्याचे सांगितले.