Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले रायगडावर, राज्यपाल यांच्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अवमान प्रकरणी आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) रायगड किल्ल्यावर (Raigad) आक्रोश मोर्चा काढणार आहेत.
MP Udayanraje Bhosale on Raigad : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अवमान प्रकरणी आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) रायगड किल्ल्यावर (Raigad) आक्रोश मोर्चा काढणार आहेत. थोड्याच वेळापूर्वी ते महाडहून रायगडकडे रवाना झालेत. निर्धार शिवसन्मानाचा असं नाव या आंदोलनाला देण्यात आले आहे. ( Maharashtra News in Marathi )
उदयनराजे रायगडावर भूमिका मांडणार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतरही कारवाई न झाल्याने उदयनराजे आज रायगडावर जाऊन भूमिका मांडणार आहेत. काल उदयनराजे किल्ले रायगडाच्या दिशेने रवाना झाले. उदयनराजे आता खासदारकीचा राजीनामा देणार की, राज्यपालांच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देणार की आणखी कुठली भूमिका घेणार हे महत्त्वाचं असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तिथे उदयनराजे पंतप्रधानांची भेट घेणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत.
रोहित पवार यांचे आज आत्मक्लेश आंदोलन
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच भाजपच्या काही नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आज आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. छत्रपती संभाजीराजांची समाधी स्थळ असलेल्या वढू बुद्रुकमध्ये रोहित पवार आत्मक्लेषासाठी बसणार आहेत.
समृद्ध विचारांचा वसा असलेल्या महाराष्ट्राची अस्मिता शाबूत ठेवण्यासाठीचा हा पवार यांनी म्हटलंय. आज रायगडावर खासदार उदयनराजे भोसले आक्रोश मेळावा घेत आहेत. त्याचवेळी रोहित पवार वढू बुद्रुकमध्ये दाखल होत आहेत. भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी राज्यातील विरोधी पक्षांसह आजचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील करत आहेत. त्यामुळे आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमी पुढे काय घडतं ते पाहावं लागणार आहे.