MPSC Exam update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व  परिक्षा 2020 पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली होती . ही परीक्षा आता 21 मार्च रोजी होणार असल्याचे अधिकृत परिपत्रक आयोगाकडून जारी करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहीरात डिसेंबर 2019 ला प्रसिद्ध करण्यात आली होती.  ही परीक्षा एप्रिल 2020 मध्ये होणार होती. त्यानंतर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.  


नुकतीच 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे आयोगाने जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आयोगाला राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पत्र मिळाल्याचे सांगण्यात आले होते. 


सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना येत्या 8 ते 10 दिवसात परीक्षा होईल  असे सांगितले. आता ही परीक्षा 21 मार्च ला होणार असल्याचे परिपत्रक आयोगाने जारी केले आहे.


राज्य सेवा  पूर्व परीक्षा 2020 चे आतापर्यंतच्या  तारखा


परीक्षेची जाहिरात जाहीर - 23 डिसेंबर 2019
परीक्षेची तारीख - 5 एप्रिल 2020
सुधारीत तारीख - 13 सप्टेंबर 2020
सुधारीत तारीख - 20 सप्टेंबर 2020
सुधारीत तारीख - 11 ऑक्टोबर 2020
सुधारीत तारीख  - 14 मार्च 2021

सुधारीत तारीख - 21 मार्च 2021