मुंबई : तुम्ही जर सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे.एमपीएससीद्वारे गट क पदांसाठी 228 जागांवर भरती होणार आहे. त्यासाठी एमपीएससीकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तरूणांनी या भरतीत त्वरीत अर्ज करावा.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमपीएससीने गट क पदांसाठी 228 जागांवर भरती जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागात गट क श्रेणीतील लिपीक ते अधिकारी पदांसाठी 228 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी एमपीएससीने 228 जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 1 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 


पद आणि जागा 


  • उद्योग निरीक्षक गट क / उद्योग निरीक्षक गट क : 06 पदे

  • दुय्यम निरीक्षक गट क / से इन्स्पेक्टर ग्रुप सी : 09 पदे

  • कर सहायक, गट क / कर सहाय्यक, गट क : 114 पदे

  • लिपिक टंकलेखक गट क (मराठी ) / लिपिक टंकलेखक गट क : 89 पदे

  • लिपिक टंकलेखक गट क (इंग्रजी ) / लिपिक टंकलेखक गट क : 10 पदे


या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 394 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 294 शुल्क भरावा लागणार आहे, तर एक्सएसएमसाठी 44 रुपये शुल्क आहे.  


दरम्यान तरूणांनी जर अद्याप अर्ज केला नसेल तर आताच अर्ज करून घ्यावा. 


ऑनलाईन अर्जासाठी : क्लिक करा