MTDC Bharti 2023 For 10th Pass : तुम्हाला फिरण्याची आवड आहे? राज्यातील पर्यटन व्यवसायाविषयी थोडीफार माहिती आहे का? मग बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच एमटीडीसीमध्ये बंपर भरती (MTDC Bharti 2023) सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमटीडीसी अंतर्गत विविध पदांच्या एकूण 39 रिक्त जागा (MTDC Jobs Vacancy) भरल्या जाणार आहेत. येथे दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरी मिळणार आहे. सहाय्यक अधिक्षक (गट-क) चे 1 पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, अभियांत्रिकी किंवा कृषी यातील पदवी पूर्ण केलेली असावी.


ज्युनिअर इंजिनीअर ग्रुप सीचे 1 पद भरले जाणार असून यासाठी इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. जतन सहायक (गट-क)  च्या  2 जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इंजिनीअरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा असावा. तंत्र सहायक (गट-क) ची 6 पदे भरली जाणार असून यासाठी उमेदवाराकडे प्राचीन भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी असावी.मार्गदर्शक व्याख्याता (गट- क) च्या एका पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. उप आवेक्षक (गट-क)  च्या 6 पदांसाठी उमेदवाराकडे दहावी सोबतच बिल्डिंग सुपरव्हिजनचा कोर्स केलेला असावा. 


फोटोग्राफरच्या एका पदासाठी उमेदवार दहावी आणि फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतलेला असावा. अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित) चे 1 पद भरले जाणार असून यासाठी उमेदवाराकडे कला शाखेची इतिहास विषयाची पदवी असावीय  फार्शीज्ञात संकलकच्या एका पदासाठी उमेदवाराकडे आर्ट्सची पदवी असावी.  रसायनशास्त्रज्ञच्या एका पदासाठी उमेदवाराकडे ग्रॅज्युएशन असावे. रिसर्च असिस्टंटच्या एका पदासाठी उमेदवार आर्ट्स ग्रॅज्युएट असावा. 


संकलक (गट-क) च्या 2 पदांसाठी उमेदवाराकडे आर्ट्समधील पदवी असावी. असिस्टंट फोटोग्राफरच्या एका पदासाठी उमेदवाराकडे फोटोग्राफीचा अनुभव असावा.  ग्रंथपाल लिपिकच्या एका पदासाठी उमेदवाराकडे ग्रंथालय शास्त्राची पदविका असावी. 


BMC Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी


अभिलेख परिचर आणि तंत्रज्ञ मदतनीस (गट-क) ची प्रत्येकी पदे भरली जाणार असून यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. अधिक्षक (गट-ब अराजपत्रित) आणि  सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य) च्या प्रत्येकी 2 जागा भरल्या जाणार असून उमेदवार पदवीधर असावा. टिप्पणी सहायक (गट-क) च्या एका जागेसाठीही पदवीधरांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 


सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित) ची 4 पदे तर  सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका) ची 2 पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवार अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र विषयातील पदवीधर असावा. 


अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षांदरम्यान असावे. मागासवर्गीय / आर्थिकदृष्टया दुर्लब घटकातील उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. खुल्या गटातील उमेदवारांकडून 1 हजार रुपये अर्ज शुल्क तरमागासवर्गीय / आर्थिकदृष्टया दुर्लब घटक/अनाथ / दिव्यांग / माजी सैनिकांकडून 900 रुपये शुल्क घेतले जाईल याची नोंद घ्या. 5 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा