पिंपरी-चिंचवड : म्युकरमायकोसीस (Mucormycosis) आजारावरील औषध काळ्या (drug black market ) बाजारामध्ये विकणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला (interstate gang) अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. दोन आरोपींकडून तब्बल बावीस अँफोटेरिसीन बी इंजेक्शन ताब्यात घेण्यात यश आली आहे. सहा हजार रुपयांचं हे इंजेक्शन बावीस ते तीस हजारांच्या दराने विक्री केली जात होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी या प्रकरणी काही आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून 4 म्युकर मायकोसिस इंजेक्शन्स जप्त करण्यात आली होती. त्याचा अधिक तपास करत असताना पोलिसांना या प्रकरणात शरण बसवेश्वर, सिद्धेश्वर ढमामे यांचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला सोलापूरमधून अटक केली. 


या इंजेक्शचा अवैध पुरवठा कर्नाटक गुलबर्गामधून होत असल्याचे पुढील तपासात समोर आले. पोलिसांनी गुलबर्गामधून राजशेखर कासाप्पा भजंत्री याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून म्युकर मायकोसिस आजरावर उपयोगी असणारे इंजेक्शनचे 22 नग असा एकूण 1 लाख 44 हजारांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला.


आरोपी भजंत्री हा गुलबर्गा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, गुलबर्गा या शासकीय रुग्णालयात कोविड तसेच म्युकर मायकोसिस विभागात नर्सिंग स्टाफ आहे. त्यामुळे या प्रकरणात मेडिकल कॉलेजमधील आणखी कुणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.