अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे :  मॉडेलिंगचा कोणताही अनुभव नसताना पुण्याच्या मुग्धा गोडबोलेनं मिसेस इंडिया युनिव्हर्स - अर्थ 2017 हा किताब पटकवला आहे. उदयपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी देशातील आणि परदेशातील 42 महिलांची निवड करण्यात आली होती. 


पुणेकर मुग्धा सिंगापूरमध्ये स्थायिक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूळची पुण्याची पण आता सिंगापूर मध्ये स्थायिक झालेली मुग्धा गोडबोले एका खाजगी कंपनी मध्ये एचआर म्हणून कार्यरत आहे. मुग्धाला लहानपणापासूनच मॉडेलींगच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करुन दाखविण्याची इच्छा होती. मात्र, करिअर आणि घर या दोन्ही गोष्टींमध्ये आपली आवड जोपासण्याची संधीच तिला मिळाली नाही. आपल्या मैत्रिणीच्या बुटीकच्या शो साठी मुग्धा पहिल्यांदा रॅम्पवर उतरली आणि तिला मॉडेलिंग क्षेत्राची दारं खुली झाली. आज वयाच्या 36 व्या वर्षी मुग्धानं मिसेस इंडिया युनिवर्स अर्थ हा किताब पटकवलाय. याचसोबत स्पर्धेतली इतर दोन सब टायटल्सही तिनं जिंकली आहेत.


मुग्धाला जिंकायचाय मिसेस अर्थ इंटरनॅशनल


लहानपणापासून कला क्षेत्राची आवड असणाऱ्या मुग्धाने शास्त्रीय संगीताचं शिक्षणही घेतलंय. व्यपस्थापनामध्ये पद्युत्तर पदवी घेतल्यानंतर नोकरीमुळे गाणं मागं पडल्याचं ती सांगते. मात्र, उशीरा का होईना आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये पदार्पण केल्याचं समाधान तिला आहे.  2018 मध्ये लास वेगस येथे होणाऱ्या मिसेस अर्थ इंटरनॅशनल या स्पर्धेत मुग्धा भारताचं प्रतिनिधीत्व करणारेय...या स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा.