Mukesh Ambani Nita Ambani Giving 2 Lakh To...: देशातील सर्वात आघाडीच्या उद्योजक कुटुंबियांपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबातील सदस्य असलेले मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी हे कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यांमध्ये असतात. मागील वर्षभरामध्ये तर हे तिघेही त्यांच्या संपत्तीसाठी आणि आलिशान लाइफस्टाइलमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. मात्र या अनेकदा अंबानी कुटुंबियांकडून समाजिक कार्यासाठी दिली जाणारी देगणी आणि केली जाणारी मदत समोर येत नाही. असं असलं तरी अंबानी कुटुंबाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या रिलायन्स समुहाकडून मुकेश अंबानी आणि नीता अंबानी बरंच सामाजिक काम करतात.


गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीता अंबानी या रिलायन्स फाऊण्डेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा आहेत. त्या अगदी गरजू मुलांपासून ते महिलांपर्यंत आणि रुग्णांपासून समाजातील उपेक्षित घटकापर्यंत सर्वांसाठीच वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात. नीता अंबानींच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमधून हजारो मुलांना आतापर्यंत मदत करण्यात आली आहे. याच सेवाभावी उपक्रमांमध्ये रिलायन्स फाऊण्डेशन शिष्यवृत्तीचाही समावेश आहे. हुशार विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या वाटेत आर्थिक संकट येऊ नये या उद्देशाने मार्कांच्या आधारावर गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून केली जाते. मात्र या शिष्यवृत्तीसाठी कुठे आणि कसा अर्ज करावा हे अनेकांना ठाऊक नसतं. त्याचबद्दल जाणून घेऊयात...


हजारो विद्यार्थ्यांना लाभ


रिलायन्स फाऊण्डेशनच्या शिष्यवृत्तीमधून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा मुख्य हेतू आहे. उच्च शिक्षणासाठी या माध्यमातून मदत केली जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमोटर धिरुभाई अंबानी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त रिलायन्स फाऊण्डेशनकडून 5 हजार पदवीधर विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. 2024-25 च्या वर्षासाठी पद्युत्तर शिक्षण घेणारे कोणते विद्यार्थी रिलायन्स फाऊण्डेशनच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. 


प्रत्येकी 2 लाख रुपये


रिलायन्स फाऊण्डेशनच्या या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातात. देशभरातील एका लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी कोण अर्ज करु शकतं असा प्रश्न पडला असेल तर यासाठीची मूळ अट फार साधी आहे. ज्यांच्या घरातील एकूण वर्षिक कमाई 15 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रिलायन्स फाऊण्डेशनच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. कोणत्याही शाखेचं शिक्षण घेणाऱ्यांना विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. तसेच विद्यार्थीनी आणि दिव्यांगांना यामध्ये विशेष कोटा राखीव ठेवण्यात आला आहे.


कंपनीच्या वेबसाईटनुसार रिलायन्स फाऊण्डेशनच्या पद्युत्तर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून देशातील सर्वच भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी आहे. तसेच या विद्यार्थ्यांना पूर्वी या योजनेच्या फायदा घेतलेल्यांकडून मार्गदर्शनही केलं जातं.