मुंबई : देशात महिलांसाठी अत्यंत असुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईच्या नजिकच भिवंडी भागात एक धक्कादायक घटना समोर आलीयच. गुरुवारी सायंकाळी एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या नर्पोली भागात ही घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांची मुलीचं शव ताब्यात घेतलं. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर पोलिसांना आणखीन माहिती मिळू शकेल. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात आयपीसी कलम ३०२, ३७६ (डी) (ए) ४५२ आणि पॉस्को ३, ४, ७ अंतर्गत प्रकरणाची नोंद करण्यात आलीय. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर हा अतिप्रसंग ओढावला. मृत मुलगी आई-वडील आणि मोठ्या भाऊ - बहिणीसोबत नर्पोली भागात राहते. तिचे आई-वडील मजुरीचं काम करतात. मुलीची शाळाही नर्पोली भागातच आहे. शाळेतून परतल्यानंतर आई-वडील कामाला गेले असल्यानं मुलगी घरात एकटीच होती. याचाच फायदा घेत आरोपीनं अगोदर या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलंय. 


मुलीचा भाऊ घरी परतल्यानंतर त्याला घराचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेत दिसला. घरात येताच त्यानं आपल्या बहिणीचं प्रेत जमिनीवर अत्यवस्थ अवस्थेत पडलेलं पाहिलं.... त्यानंतर त्यानं केलेल्या आरडा-ओरडीनंतर शेजारी गोळा झाले... आणि स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आली.