Bullet Train Project: देशातील पहिली हाय-स्पीड ट्रेन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे रूळ टाकण्याच्या संदर्भात आणि रेल्वेचा स्पीड 320-350 किमी प्रति तास गतीने करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉरिडोर लिमिटेड (NHSRCL) ने सूरतमध्ये पहिली ट्रॅक स्लॅब निर्माण फॅक्ट्री स्थापित केली आहे. ज्याची उत्पादन क्षमता 120 स्लॅब प्रतिदिन आहे. हा स्लॅबमुळं रेल्वे रूळांवर पकड ठेवता येणार आहे. जेणेकरुन ट्रेन अतिवेगात धावू शकणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स (BKC) आणि डहाणू दरम्यान पुढील वर्षात आणखी एक फॅक्ट्री स्थापन केली जाणार आहे. जेणेकरुन महाराष्ट्रात रेल्वे रूळ टाकण्यासाठी स्लॅब बनवण्यात येतील. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरा ट्रॅक स्लॅब फॅक्ट्रीसाठी फेब्रुवारी 2025 पर्यंत टेंडर जारी करण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रात त्याचे स्थान निश्चित्त करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केले जाणार आहेत. 


फॅक्ट्रीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 


सूरत येथील कारखान्यात शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करुन बॅलास्टरहित स्लॅब बनवण्यात येणार आहे. जो गुजरात आणि दमण-दीवमध्ये 237 किमी लांबीच्या हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरवर स्बॅलचे काम करण्यात येणार आहे. हा स्लॅब 2200 मिमि चौरस,4900 मिमि रुंद आणि 190 मिमि जाड असणार आहे. याचे वजन जवळपास 3.9 टन इतकं असेल. कॉक्रिंट आणि डांबरच्या मिश्रणाने तयार करण्यात येणार आहे. ज्यावर 60 किलोंचा वजनी ट्रॅक बांधण्यात येईल. 


कसा आहे हा प्रकल्प?


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण लांबी 508 किमी इतकी आहे. यात गुजरात आणि दादरा अँड नगर हवेलः352 किमी, महाराष्ट्रः156 किमी इतका आहे. 


एकुण स्थानके किती?


एकुण स्थानकांची संख्या 12 असून यात मुंबई, ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती, अशी स्थानकांची नावे आहेत. 


बुलेट ट्रेनचे किती काम झाले?


पिअर फाउंडेशनः356 किमी
पियर वर्कः345 किमी
गर्डर कास्टिंगः273 किमी
वायाडक्ट निर्माणः233 किमी
Noise Barriers: 91 किमी
महाराष्ट्रतील बीकेसी ते ठाणेपर्यंत 21 किमीपर्यंतच्या बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. 


बुलेट ट्रेनच्या तिकिटांचे दर किती असतील?


बुलेट ट्रेनचे तिकिट विमानापेक्षा स्वस्त असणार आहे. सर्वसामान्यांना परवडणारे असणार आहे, अशी माहिती समोर येतेय. एसी फर्स्ट क्लासच्या आसपास भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे असू शकते. म्हणजेच साधारण 3,000 ते 5,000 पर्यंत पहिल्या बुलेट ट्रेनचे तिकिट असू शकते.