Maharashtra Breaking News Today : राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या बीएमसीसह (Mumbai Bmc News) सर्वच महापालिका निवडणुका आता 2024 मध्ये ढकलल्या जातील अशी (bmc polls may be pushed to 2024) शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टात लागलेल्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political News) निकालामुळे उद्धव ठाकरेंकडे सहानुभुतीची लाट असल्याची अटकळ सरकारमध्ये बांधली जातेय. (Mumbai bmc election news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वासही दुणावलाय. त्यामुळे सत्ताधारींना अनुकुल वातावरण नसल्याचा अंदाज बांधत निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास 23 महापालिका गेल्या 2 वर्षांपासून प्रशासकाद्वारे चालवल्या जात आहेत. आधी कोविडमुळे आणि नंतर सुप्रीम कोर्टाने ओबीसी राजकीय आरक्षण काढून घेतल्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. (mumbai bmc polls and All municipal elections may be pushed to 2024 big news uddhav sena )


'या' मनपा अजूनही प्रलंबित 


मुंबई
ठाणे
नवी मुंबई
कल्याण - डोबिंवली
उल्हासनगर
भिवंडी-निजामपूर
वसई-विरार
मिरा-भाईंदर
पुणे
पिंपरी-चिंचवड
सोलापूर
कोल्हापूर
नाशिक
अकोला
अमरावती
नागपूर
संभाजीनगर
नांदेड-वाघाळा
लातूर
परभणी
चंद्रपूर
मालेगाव
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
नाशिक
जळगाव
अहमदनगर
पुणे
सातारा
सांगली
सोलापूर
कोल्हापूर
संभाजीनगर (औरंगाबाद)
जालना
परभणी
हिंगोली
बीड
नांदेड
धाराशिव
लातूर
अमरावती
बुलढाणा
यवतमाळ
वर्धा
चंद्रपूर
गडचिरोली