Elephanta Caves Boat Accident: मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियायेथून एलिफंटाकडे जाताना बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक प्रवाशी हे पर्यटनासाठी मुंबईत आले होते. अनेक प्रवासी हे राज्याबाहेरील होते तर काही दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्व्स्त झाले आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यात एका चिमुकल्याचाही समावेश आहे. नाशिकमधील एका दाम्पत्याचा आणि चिमुकल्याने या दुर्घटनेत प्राण गमावले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेटवे ऑफ इंडिया येथून दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास नीलकमल नावाची बोट 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाकडे निघाले. गेटवे ऑफ इंडिया पासून सात ते ८ किलोमीटर अंतरावर गेली असता तीन वाजून 55 मिनिटांनी चेकिंगसाठी काढली नऊ दलाच्या स्पीड बोटने नीलकमल बोटीला धडक दिली. स्थानिक मच्छीमारांच्या बोटी तसेच पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटीने ताबडतोब या ठिकाणी पोहोचून मदत कार्य सुरू केले अनेक प्रवाशांना या बोटीत बसवून उरण तसेच मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे तसेच भाऊचा धक्का येथे आणण्यात आले. मात्र. या दुर्घटनेत 13 जणांनी आपले प्राण गमावले आहेत तर 2 जण बेपत्ता झाले आहेत.


मुंबईच्या बोट दुर्घटनेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावमधील आहेर कुटुंबातील दाम्पत्यासह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आई-वडील आणि चिमुकल्याच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. आजारावर उपचारासाठी मुंबई आलेल्या या कुटुंबीयांची ही ट्रिप शेवटची ठरली आहे. आजारावर उपचारासाठी पिंपळगाव येथील राकेश नाना अहिरे दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलासह मुंबईला आले होते. मात्र, बोट दुर्घटनेत आहिरे कुटुंबीयांचा बळी गेला आहे. राकेश आहिरे यांचा बुडून मृत्यू झाला, तर हर्षदा व निधेश आहिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


रुग्णालयात उपचार घेऊन ते बुधवारी सायंकाळी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र, नौदलाच्या स्पीडबोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात आहिरे कुटुंबातील तिघांचे श्वास थांबले. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेने पिंपळगाव बसवंतच्या आहिरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.