COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात भविष्यात महाराष्ट्र एकसंघ राहील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीय. २५ हजार गावांतली शिवारं जलयुक्त करण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. परकीय गुंतवणुकीत राज्य सरकारची कामगीरी उल्लेखनीय असून परकीय गुंतवणुकीच्या ४२-४७ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


ईपीएफओच्या सर्वेक्षणानुसार रोजगार निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.