पुणे : मुंबई ड्रग्स केस प्रकरणात साक्षीदार असलेला किरण गोसावी पुणे पोलिसांसमोर शरण येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किरण गोसावी फरार असल्याचं बोललं जात होतं. किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने लावलेले सर्व आरोप किरण गोसावी याने फेटाळले आहे. आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचं किरण गोसावी याने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात अनेक मोठ्या नावांचा सहभाग असल्याचं किरण गोसावी याने म्हटलं आहे. ड्रग्स केस दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही किरण गोसावी याने केला आहे. 


ड्रग्स केस प्रकरणाशी संबंध


एनसीबीने मुंबई ड्रग्स केस उघड केल्यानंतर किरण गोसावीचे आर्यन खानसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. किरण गोसावी याचे एनसीबीशी संबंध नसताना एनसीबीने कारवाई केल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानबरोबर कसा असे प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. गोसावी हा या प्रकरणात पंच साक्षीदार असल्याचं एनसीबीने स्पष्ट म्हटलं होतं. आर्यननसोबत त्याने काढलेला सेल्फीही व्हायरल झाला आहे.


प्रभाकर साईलचा आरोप


अभिनेता शाहरुख खानच मुलगा आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक खुलासा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केला आहे. प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी वानखेडेंना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे. किरण गोसावीच्या सांगण्यावरून साईलने 50 लाख रुपये कलेक्ट केल्याचा खुलासा त्याने केला आहे. या 50 लाखांतले 38 लाख रुपये सॅम डीसोझाला दिल्याचा दावा देखील प्रभाकर साईल याने केला आहे.