रत्नागिरी :  Mumbai-Goa highway Landside collapses : मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आहे. याचा परिमाण वाहतुकीवर झाला आहे. या मार्गावरीलम मोठी माती आल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड बाजुला हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि क्रेन दाखल झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळली. परशुराम घाटात ही दरड कोसळली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक गेल्या तासाभरापासून ठप्प आहे. या दरडीखाली जेसीबी गाडला गेला आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती देण्यात आली.


या घाटातील मध्यवर्ती ठिकाणी चौपदरीकरणा अंतर्गत डोंगर कटाई सुरु आहे. त्यासाठी काम सुरु होते. रस्त्याच्या वरील बाजूस पोकलेनने खोदाई केली जात असतानाच बाजूचा डोंगराचा भाग खाली आला. त्यामध्ये एक पोकलेन अडकला आहे.  याआधीही पावसाळ्यात परशुराम घाटात दरडीचा धोका निर्माण झाला होता.



दरम्यान यावेळस काही दुर्घटना घटना घडल्या. त्यामध्ये पेढे येथील एका घरावर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर चार दिवसांपूर्वीच एक भलामोठा दगड घरावर येऊन मोठे नुकसान झाले होते.