रायगड : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. त्यामुळे कोकणात येणा-या लाखो गणेश भक्तांना याच खड्यातून गावाकडे जाण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कोट्यवधी रुपयांची कामं ज्या कंपन्यांना देण्यात आलीत. त्याच कंपन्यांकडे चौपदरीकरण होईपर्यंत हा मार्ग सुस्थितीत ठेवण्याची जवाबदारी देण्यात आलीय. मात्र, त्या कंपन्या महामार्गावर मात्र कुठेच दिसत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक ठिकाणी तब्बल अर्धा फुटांपर्यंत खड्डे रस्त्याला पडलेत. वारंवार रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाच्या नोटीस काढणा-या बांधकाम विभागाच्या अधिका-यांनाही  चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपन्या जुमानत नसल्याचं समोर आलंय.


गणेशोत्सव तोंडावर आल्यानंतरही या महामार्गाची दुरुस्ती होत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा आदीती तटकरे आणि युवा नेते अनिकेत तटकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं.