मुंबई - गोवा महामार्गाचा प्रवास होणार सुसाट
कोकणी चाकरमान्यांचा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे.
रत्नागिरी : कोकणी चाकरमान्यांचा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. पुढच्या वर्षी कोकणात मामाच्या गावाला जाणारी बच्चेकंपनी किंवा गणपतीला श्रद्धेने जाणारे चाकरमानी वेगाने आपापल्या गावी जाऊ शकणार आहेत. कारण गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाचे काम मे २०१९ पर्यंत जवळपास पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागानं केला आहे. या कामाच्या विविध टप्प्यांची माहिती देणारा खास व्हिडिओच राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या कामाचे श्रेय घेण्याची तयारी भाजपाने सुरू केल्याचे यावरुन स्पष्ट होते आहे. सध्या क्राँक्रीटीकरणाचे काम सुरु असून मे २०१९ पर्यंत या महामार्गाचे काम १०० टक्के पूर्ण झालेले असेल असा दावा सरकारने केला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे काम पूर्ण होईल, असा दावा केला आहे.
खेड - पोलादपूर दरम्यानचे काम