माथेरानच्या लॉजमध्ये महिलेचा नग्न मृतदेह, मुंडकं घेऊन मारेकरी फरार
लॉजमधील हत्याकांडाचे धागे गोरेगावपर्यंत कसे पोहोचले?
रायगड : पर्यटन स्थळ असेलल्या माथेरानमध्ये महिलेच्या निर्घृण हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माथेरानच्या एका लॉजमध्ये शिर नसलेल्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या महिलेचं वय ३० वर्षीय असून ती मुंबईतल्या गोरेगाव इथं राहणारी असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिचा साथीदार माथेरानमधल्या एका लॉजमध्ये बनावट नावाने राहत होते, त्यांनी त्यांची ओळखपत्रंही सादर केली नव्हती. हॉटेल मधील कर्मचारी सकाळी रुम सर्व्हिससाठी रुमवर गेले असता त्यांना नग्न अवस्थेतला महिलेचा शिर नसलेल्या मृतदेह आढळला.
महिलेचं शीर अद्याप सापडलेलं नसल्याचं पोलिसांनी सांगितले. महिलेसोबत असलेला पुरुष जोडीदार सर्व सामानासह फरार झाला आहे. महिलेची ओळख पटू नये यासाठी मारेकऱ्याने महिलेच्या अंगावरचे कपडेही पळवून नेले. पोलिसांच्या हाती लॉजचा सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं असून यात महिला आणि तिच्या जोडीदाराने मास्क घातला आहे.
पोलिसांच्या तपासात ही महिला गोरेगाव इथली असून तिचं नाव पूनम पाल असल्याची माहिती मिळाली आहे. लॉजपासून ५० मीटर अंतरावर सापडलेल्या एका हँडबॅगवरुन पोलिसांना या महिलेची ओळख पटवण्यात यश आलं.
या लॉजचा मालक केतन रामाणे यांने या दोघांनाही कोणत्याही ओळखपत्राशिवाय लॉजमध्ये राहण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे दोघांची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.
कुटुंबियांनी दिली होती बेपत्ता असल्याची तक्रार
महिलेच्या कुटुंबियांना पूनम पाल बेपत्ता असल्याची तक्रार गोरेगाव पोलीस ठाण्यात नोंदवली होती. माथेरान पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पाच पथकं तयार केली आहेत. तर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.
अधिक तपासात महिलेच्या कुटुंबीयांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली होती. माथेरान पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यासाठी आणि महिलेच्या डोक्याचा शोध घेण्यासाठी 5 पथके तयार केली आहेत. तर माथेरानच्या बीजे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली मिसाळ यांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.