Mumbai Hidden Hill Station Yeoor Hills : गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जहू चौपाटी आणि बरचं काही... मुंबई म्हंटल की डोळ्यासमोर येतात ते समुद्र किनारे. देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळ देखील आहे. मुंबई हे जगभरातील पर्यटकांचे आवडते टूरीस्ट डेस्टिनेशन देखील आहे.  यामुळे सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. मुंबईच्या गर्दीत दडलेलं छुप हिल स्टेशन आहे. मात्र, या हिलस्टेशन पर्यंत जाणारा मार्ग हा मुंबई बाहेरुन आहे. जाणून घेऊया या पर्यटनस्थळाविषयी.


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घराबाहेर पार्क केलेल्या असतात होड्या; पाण्यात दडलेलं कोकणातील छुपं बेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील हे छुप हिल स्टेशन मुंबईच्या बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्कचाच भाग आहे. मात्र, या हिलस्टेशनला जायचे असले तर इथे जाण्यासाठी मुंबईतून प्रवेश नाही. या हिल स्टेशनपर्यंत पोहचायचे असेल तर मुंबईच्या बाहेर जावे लागते. मुंबईलगत असलेल्या या हिलस्टेशनला ठाण्यातून प्रवेश दिला जातो. हे हिल स्टेशन आहे येऊर हिल्स (Yeoor Hills).... येऊर हे मुंबईजवळचे सर्वात लहान पण तितकेच लोकप्रिय हिलस्टेशन आहे. 


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील हनीमून स्पेशल स्पॉट! कमी बजेटमध्ये बेस्ट ट्रीप, बेंगलोर, गोवा आणि काश्मिरला देतात टक्कर 


येऊर हिल्स हे मुंबईचे मिनी महाबळेश्वर आणि मिनी माथेरान म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या गर्दीपासून हे ठिकाण अलिप्त आहे. येऊरचे जंगल हे मंबईच्या  नॅशनल पार्क पासून ठाण्याच्या येऊर पर्यंत पसरलेले आहे. मात्र, येऊरला जाण्यासाठी बोरीवली नाही तर ठाण्यातून प्रवेश दिला जातो. यामुळे येऊर हिल्स हे मुंबईच्या गर्दीपासून अलिप्त झाले आहे. यामुळे ठाणे महापालिका परिसरात येणारे निसर्गरम्य येऊर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. 


सुंदर पर्वत रांगेत असलेले हे पर्यटन स्थळ आपल्या सौंदर्याने पर्यटकांना भुरळ घालते. पावसाळ्यात येथे अल्हाददायक वातावरण असते. येऊरच्या जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती देखील पहायला मिळतात.  येऊरच्या जंगलात वन्य प्राण्यांचा देखील वावर आहे. 


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले येऊरचे जंगल हे सध्या चांगलेच लोकप्रिय होत आहे. येऊरमध्ये सात आदिवासी पाडे आहेत. सुमारे साडेतीन हजार इतके आदिवासी नागरिक येथे राहतात. येऊलमध्ये अनेक खाजगी बंगले तसेच रिसॉर्ट आहेत. अनेक पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात आणि निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटतात.