Hasan Mushrif Kirit Somaiya Mumbai High Court : ईडीच्या छापेमारीनंतर ( ED Raid  ) अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना (Hasan Mushrif ) मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टानं पोलिसांना दिलेत. कोल्हापुरात ईडीन दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर कोर्टानं मुश्रीफ यांना दिलासा दिला आहे. तर  दुसरीकडे मुश्रीफांवर सातत्याने आरोप करणा-या भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांना हायकोर्टानं मोठा झटका दिला आहे. (ED Raid on Hasan Mushrif  House)


 किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हसन मुश्रीफांची हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावेळी हायकोर्टाने मुश्रीफ यांना दिला. तर भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना त्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते, असा सवाल हायकोर्टाने विचारला. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना...


हायकोर्टानं भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी केलेत. हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते, असा सवाल न्यायालयानं उपस्थित केलाय. त्यामुळे याप्रकरणी किरीट सोमय्यांची चौकशी करावी, असे आदेश हायकोर्टानं पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना दिलेत. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


सोमय्या हे तक्रार करतात आणि त्यानंतर ईडी छापा मारत कारवाई करते. हे केवळ एक राजकीय षड्यंत्र आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करता आपल्याला ईडी प्रकरणांमध्ये अडकविण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न चालला आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द संपविण्याचा तसेच उद्ध्वस्त करण्यासाठी हा सगळा घाट घातला जात आहे, असा दावा मुश्रीफ यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेद्वारे केला होता. त्यानंतर कोर्टाने काही सवाल उपस्थित केलेत. यात मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्या यांना न्यायालयांच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते, असा थेट सवाल उच्च न्यायालयाने केला.


दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत सोमय्या म्हणाले होते, हसन मुश्रीफ यांच्यावर देखील कारवाई सुरु आहे. माझी मागणी आहे मुश्रीफ यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. त्यानंतर ईडीकडून मुश्रीफ यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत.