मुंबई : कोरोना (Coronavirus) विषाणूचा वाढता संसर्ग पाहता राज्य आणि केंद्र शासनानं सतर्क राहत काही महत्त्वाची पावलं उचलली. ज्यामध्ये शिथिलता देण्यात आलेले नियम पुन्हा एकदा काही अंशी आणखी कठोर करण्यात आले होते. दुकानांच्या वेळा, संचारबंदी असे निर्देश प्रशासनानं देऊ केले होते. पण, आता मात्र या निर्बंधांमध्ये राज्यात शिथिलता आणली जाणार असल्याची चिन्हं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 ऑगस्टपासून सध्या लागू असणाऱ्या नियमांमध्ये ही शिथिलता आणली जाणार आहे. ज्याअंतर्गत दुकानं सुरु ठेवण्याच्या वेळाही वाढवून दिल्या जाणार असल्याचं कळत आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 


रेल्वेबाबतही आज निर्णय होणार 
एकिकडे राज्यात कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणली जात असतानाल (Local) रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्यांना केव्हा मुभा दिली जाणार हा एकत प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. राज्य शासनही सध्या मुंबई लोकलच्या बाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत असून, गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी  (task force) टास्क फोर्स आणि तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर लोकल प्रवासासंदर्भातील निर्णयही होणार आहे. 


लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास? आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत


 


हलगर्जीपणा नको, केंद्राचा इशारा 
नियमांमध्ये शिथिलता आणली जाणार असली तरीही 31 ऑगस्टपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक नियम कायम ठेवा असं केंद्राचं म्हणणं असून, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट जास्त आहे तेथे निर्बंध आणखी कठोर करण्यात यावेत अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केल्या आहेत. त्यामुळं केंद्राच्या सूचना आणि राज्यातील परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील कोरोना नियमांमध्ये नेमकी किती शिथिलता येते आणि रेल्वेबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.