मुंबई : रेल्वे लोकल (Mumbai Railway Travel) संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी कोरोना लसीचे 2 डोस (Corona Vaccine 2 Dose) घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. 15 ऑगस्टपासून सर्वसामांन्यासाठी रेल्वे ट्रॅकवर येणार आहे. मात्र कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 15 दिवस पूर्ण झालेल्यांनाच लोकलने प्रवास करता येणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे संवाद साधत होते. या दरम्यान त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे 2 डोस घेतलेल्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.  (CM Uddhav Thackeray has allowed citizens who have taken 2 doses of corona vaccine to travel by mumbai suburban local railway)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून लोकल प्रवासावर निर्बंध


कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत काही महिन्यांचा अपवाद वगळता सर्वसामान्यांना लोकल प्रवासावर बंदी होती. लोकल सेवा सुरु करावी, यासाठी अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी विनंती केली होती. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास  मान्यता दिली आहे. 


अशी होणार अंमलबजावणी


कोरोनाचे डोस घेतलेल्यांना परवानगी मिळालेली आहे. पण आता यातून काही जण पळवाट शोधून गैरमार्गाने रेल्वे प्रवास करतील. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी एक सिस्टम सरकारने तयार केली आहे. त्यानुसार ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्या प्रवाशांना मोबाईल एपच्या (Mobile App) मदतीने  रेल्वे पास डाऊनलोड करता येणार आहे.


ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्याचं काय? 


पास डाऊनलोड करण्यासाठी स्मार्टफोन हवाय. पण ज्यांच्याकडे पास नाही, त्यांचाही विचार सरकारने केला आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांना शहरातील पालिकेच्या  प्रभाग कार्यालयांमधून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेता येणार आहे. विशेष म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर  क्यू आर कोड (Q R CODE) असणार आहे. ज्यामुळे  रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल.