मुंबई / बदलापूर : मुसळधार पावसामुळे (torrential rains) कसारा टिटवाळा रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.(Kasara-Titwala railway traffic jammed) त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. उंबरमाळी स्टेशनवर प्लॅटफॉर्म लेव्हलला पाणी पोहोचले आहे. त्यामुळे पाऊस असाच पडत राहिला तर हे स्टेशन पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस जोरदार पाऊस असेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसळधार पावसामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे वाहतूक बंद झाल्याने कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले आहेत. उंबरमाळी स्टेशनमध्ये पाणी घुसल्याने वाहतूक बंद आहे. याचा परिमाण टिटवाळा ते कसारा लोकल वाहतुकीवर झाला आहे. मात्र, कर्जतपर्यंत वाहतूक बंद असली तरी अंबरनाथपर्यंत रेल्वे वाहतूक सुरु आहे.


उंबरमाळी स्टेशनमध्ये पाणी घुसल्याने ट्रॅकवर पाणी, गाळ साचल्याने लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वालधुनी नदी पात्रतवाढ झाल्याने नदी लगत असलेल्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. 


कल्याण-डोंबिवलीत रात्रभर जोरदार पावसामुळे कल्याण मध्ये सखल भागात पाणी साचले. वालधुनी नदीपात्रत पाण्याची वाढ झाल्याने नदी लगत असलेल्या अशोक नगर शिवाजीनगरमध्ये घरात पाणी घुसले.


सायन-किंग्ज सर्कल इथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी आहे. किंग्ज सर्कल इथे पादचारी पुलाखाली कंटेनर अडकल्याने रस्ता बंद आहे. बाजूच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. मात्र धीम्या गतीने वाहतूक  असल्याने कोंडीत वाढ झाली आहे. रात्री हा कंटेनर पुलाखाली अडकला आहे, अद्याप हटवण्यात आला नसल्याने कोंडीत वाढ झाली आहे.


दरम्यान, रायगड जिल्ह्यात बुधवारी संध्‍याकाळपासून मुसळधार कोसळत असलेल्‍या पावसामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाडच्‍या सुकट गल्‍ली, भोईघाट परीसरात अडीच ते तीन फूटांपर्यंत पाणी आहे. तर बाजारपेठेत दोनफुटांपेक्षा अधिक पाणी आहे. दस्‍तुरीनाका , क्रास्‍तीस्‍तंभ परीसरदेखील जलममय झाला आहे. शहराजवळून वाहणारया सावित्री आणि काळ या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे


रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. संध्याकाळनंतर वाशिष्ठी नदीची पातळी वाढली त्यामुळे चिपळूण बाजारपेठेत शिरलं पाणी, वड नाका, टिळक वाचनालय या परिसरात रस्त्यावर पाणी पाहायला मिळाले आहे. घाटमाथ्यावर झालेला मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरलं आहे त्यामुळे रात्र चिपळूणकराना जागून काढावी लागली.